
सर्पमित्र कृष्णा पाटील यांनी पकडत सोडले नैसर्गिक अधिवासात…
अमळनेर:- येथील ज्ञानेश्वर कॉलनीत सर्प मित्र कृष्णा पाटील यांना दुर्मिळ जातीचा नाणेटी (स्ट्रीपड किलबॅक) जातीचा सर्प आढळून आला. कृष्णा पाटील यांनी त्यास पकडत नैसर्गिक अधिवासात सोडले.
शहरातील ज्ञानेश्वर कॉलनीत भूषण पाटील यांच्या घरात साप निघाल्याची माहिती सर्प मित्र कृष्णा पाटील यांना कळवण्यात आले. पाटील यांनी सर्प पकडला असता त्यांना तो दुर्मिळ जातीचा असल्याचे आढळून आले. सर्वसाधारणपणे हा साप मध्यप्रदेश आणि विदर्भात आढळून येतो. २०१३ नंतर हा साप मला सापडला आहे. या सापाच्या अंगावर वेगळ्या प्रकारचे चट्टे आहेत. साडे तीन ते चार फुटापर्यंत त्याची वाढ होते. हे साप गटागटाने राहत असतात. एकटे फिरत नाहीत. परंतु हा साप भरकटलेला असावा. याचे खाद्य घरातील उंदीर ,पाल ,पक्ष्यांची अंडी असेच आहे. हा पूर्णपणे बिनविषारी आहे, असे सर्प मित्र कृष्णा पाटील याने सांगितले.







