संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी संचालकांकडे केली सात कोटी निधीची मागणी…
अमळनेर:-महाराष्ट्र राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाचे संचालक किरण कुळकर्णी यांनी काल दि. 8 रोजी अमळनेर नगरपरिषदेत धावती भेट दिली, यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.
परिषदेची थोडक्यात माहिती त्यांनी जाणून घेतली, यावेळी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव यांनी कुलकर्णी यांचा शाल, व बुके देऊन सत्कार करत डीएमए कडे अंमळनेर नगरपरिषदचे 7 कोटी बाकी असल्याने ती अदा करण्याची मागणी केली तसेच १०,२०,३० आश्वासित प्रगती योजना, डिसीपीएस, जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी मुद्दे मांडले, यावर संचालकानी केलेल्या मागण्याची दखल घेऊ असे आश्वासन दिले आहे. तसेच, या प्रसंगी नगरपरिषदेच्या विविध विभागांनी आपापल्या विभागाचे उत्कृष्टपणे सादरीकरण केल्याने संचालकांनी कौतुक केले. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी या वेळी बांधकाम अभियंता अमोल भामरे, नगर अभियंता वाघ, पाणीपुरवठा अभियंता बैसाणे, सत्यम पाटील, तोंडे, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, हैबतराव पाटील, लाईट अभियंता प्रशांत ठाकूर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
ह्या बातम्या देखील वाचा
November 24, 2024