कलाली येथील एकावर मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील कलाली येथे वकिलाची गचांडी पकडुन सोन्याची चेन हिसकावत धक्काबुक्की करणाऱ्या एकावर मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कलाली येथील फिर्यादी ॲड. पद्माकर पाटील यांच्याकडून सुदाम भगवान भील याने पैसे घेतले होते. सुदाम याने ते पैसे परत केले नाहीत तसेच तो शेतीच्या कामाला ही येत नसल्याने फिर्यादीने त्यास विचारपूस केली असता त्याचा राग येवून त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून तुझी वकिली तिकडे दाखव, मी कोर्ट कचेरीस घाबरत नाही असे सांगत चापटबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची ३५ हजार किमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतली. त्यावरून मारवड पोलिसांत सुदाम भगवान भील याच्याविरुद्ध भादवि कलम ३९२, ३२३, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.