
अमळनेर:- अमळनेर येथील डाॅ. एपीजे अब्दुल कलाम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती डाॅ. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथिनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार जितेंद्र ठाकूर व मुन्ना शेख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष चेतन जाधव, भैय्या पाटील, मुख्याध्यापिका कविता जाधव, प्रतिक्षा पाटील, निकिता बोरसे, विनोद पवार, पुजा वसावे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.







