
निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी गायले गीत…
अमळनेर:- आगामी निवडणुकांसाठी शासनाने मतदार यादी पुनर्परीक्षण, नवे मतदार समाविष्ट करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी स्वतः अहिराणी गीत सादर करून मतदार जनजागृती सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या मार्गदर्शनाने महाजन यांनी हे गीत अहिराणी भाषेतून म्हटले आहे. गीताला संगीत व ध्वनी मुद्रण दोंडाईचा येथील एकनाथ मराठे यांचे आहे. सुदाम महाजन यांच्या समवेत सुनीता माळी यांचे संवाद आहेत. या गीतातून पती पत्नीला सांगतो की काय डोळे लावून बसले आपली मुलगी अठरा वर्षांची झाली. त्यावेळी पत्नीला मुलीचे लग्न करावे लागेल अशी चिंता वाटते. त्यावर पती तिच्यावर रागावतो आणि म्हणतो की नाही तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यापूर्वी तिचे नाव मतदार यादीत टाकावे लागेल. तिला देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी तिला मतदार करून नेता निवडण्याचा अधिकार द्यावा लागेल मग तिचे लग्न करावे लागेल. आपला मुलगा व मुलगी अठरा वर्षाची झाली की त्यांचे नाव मतदार यादीत टाका. असे आवाहन अहिराणी भाषेतून करण्यात आले आहे. हे गीत लवकरच संगीतबद्ध होवून प्रसारित केले जाणार आहे.







