
इंद्रापिंप्री येथील अधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न…
अमळनेर:- तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील नाला खोलीकरण कामातून झालेल्या जलसाठ्याचे जलपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
तालुक्यातील अटल भूजल योजनेअंतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आले होते. त्यात उपजिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी श्रीमती तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी चिंचोले, व जलसंधारण विभागाचे गोपाल पाटील, श्रीयुत खलाणे, श्रीयुत देसले आदी इंद्रापिंप्री येथे आले असता नाला खोलीकरण कामाची पाहणी केली. अटल भूजल योजनेत कृषी विभागाकडून तीन लाख रुपये खर्चून झालेल्या या नाला खोलीकरण कामामुळे मोठा जलसाठा निर्माण झाला आहे. या जलसाठ्याचे जलपूजन तडवी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अटल भूजल योजनेतून झालेल्या या कामामुळे पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले व झालेल्या कामाबद्दल समाधानी व्यक्त केले. यावेळी अटल भूजल योजनेचे समाधान पाटील, कृषी विभागाचे किरण पाटील, अविनाश खैरनार, सुप्रिया पाटील, तलाठी, ग्रामस्थ रविंद्र भिल, प्रमोद पाटील, नगराज पाटील, लोटन पाटील, रामलाल पाटील, भागवत पाटील, पोपट पाटील, किरण पाटील, रतन पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.







