
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी रोशन पन्नालाल मावळे हा राज्यशास्त्र विषयाच्या नेट परीक्षेत ८७.०६ टक्के मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तो सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरला आहे.
तो लोकसंघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे व दहिवद च्या माजी सरपंच नंदाबाई मावळे यांचा चिरंजीव आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.







