
पं. नेहरू माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतला लाभ…
अमळनेर:- सद्यस्थितीत सर्वत्र डोळ्यांची साथ सुरू असल्याने फाफोरे येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयात डोळ्यांची काळजी म्हणून आय ड्रॉप शिबीर घेण्यात आले.
माजी नगरसेवक राजू फाफोरेकर यांच्या सौजन्याने झालेल्या या शिबिराचा 175 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.यावेळी राजू फाफोरेकर,मुख्याध्यापक प्रताप पाटील आणि सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लिओ क्लब अध्यक्ष प्रणित झाबक, सेक्रेटरी वेद पाटील,जीएसटी हरिओम अग्रवाल,गौतम मुंदडा, प्रतीक गोलेच्छा यांनी परिश्रम घेतले.
स्व.श्यामदादा मुंदडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त अन्नदान…
लिओ क्लब अमळनेर तर्फे स्व मधुसूदन सुरजमल मुंदडा उर्फ स्व.श्यामदादा मुंदडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त माळीवाडा येथील मधुसूदन सुरजमल मुंदडा विद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले.







