अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथे गावठी दारूची हातभट्टी मारवड पोलिसांनी उध्वस्त करत एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
सपोनि शितलकुमार नाईक यांना भरवस येथील शेतशिवारातील नाल्यात शेवंताबाई त्र्यंबक भील ही महिला गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे पथक रवाना केले. त्याठिकाणी छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्याने शेवंताबाई पळून गेली मात्र त्याठिकाणी १५० लिटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व इतर साहित्य आढळून आल्याने पोलिसांनी नमुने घेत ते उध्वस्त केले. शेवंताबाई विरुद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ सचिन निकम हे करीत आहेत.