नांदेडकर सभागृहात कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन…
अमळनेर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ५ सप्टेंबर रोजी जळगाव येथे होणाऱ्या स्वाभिमान सभेचा आढावा घेण्यासाठी अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरद पवार) गटातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २२ रोजी शहरातील नांदेडकर सभागृहात दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक रिता बाविस्कर उपस्थित राहणार आहेत. तालुकाध्यक्ष सचिन पाटील व शहराध्यक्ष शाम पाटील यांनी कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन केले आहे.