
गणेशोत्सव व आगामी सन उत्सवांच्या अनुषंगाने केले आयोजन…
अमळनेर:- जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक जळगांव एम राजकुमार यांच्या उपस्थितीत आज दि.१५ रोजी दुपारी २:४५ वाजता वाणी मंगल कार्यालय पवन चौक येथे सार्वजनिक गणपती उत्सव व आगामी सन उत्सव यांच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

तरी सदर बैठकीत सर्व आजी माजी आमदार, नगरसेवक, सर्व शासकीय शाखा प्रमुख, शांतता कमिटी सदस्य, सर्व पत्रकार बांधव, पोलीस पाटील, महिला दक्षता मंडळ, सर्व गणपती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच हिंदू व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी आणि पंच मंडळी अशा सर्वांना शांतता कमिटी बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी केले आहे.





