अमळनेर:- तालुक्यातील खापरखेडा शिवारात गावठी दारू विकणाऱ्या एकास मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील खापरखेडा शिवारात बोरी नदीच्या काठी गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता योगेश देविदास पाटील (रा दरेगाव) याला गावठी दारुसह रंगेहाथ पकडले. त्याचेकडून १२०० रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू मिळून आली असून नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. मारवड पोलीसात दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ संजय पाटील करीत आहेत