लोण खु. येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील लोण खुर्द येथील साठ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील लोण खुर्द येथील साठ वर्षीय महिलेच्या पती व मुलाचे निधन झाल्याने घरी एकटी राहते. दिनांक २१ रोजी रात्री सदर वयोवृद्ध महिला रात्री घरी एकटी झोपली असताना दिनांक २२ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दीपक गुलाब ठाकरे (भील) हा सदर महिलेच्या घरात घुसला, सदर महिला लाईट लावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने महिलेस पकडुन खाटेवर ढकलले आणि लज्जा उत्पन्न असे कृत्य करू लागल्याने महिलेने आरडाओरड करताच तो पळून गेला. आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे लोक गोळा झाल्याने त्यास शोधण्याचा प्रयत्न केला असता तो मिळून आला नाही. महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास म.हे.कॉ. रेखा श्रीराम इशी ह्या करीत आहेत.