
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण या विद्यार्थिनी स्वयंसेवकाने केले. सदर कार्यक्रमात महात्मा गांधींच्या प्रतिमापूजन करण्यात आले. आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. डी. टी. कदम यांनी केले. कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा. डॉ. एम. के.वाघमारे यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापनेचा इतिवृत्त विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला आणि आजच्या काळात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्र घडण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा मूल्य वाटा आहे असे सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पी.सी.पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची प्रात्यक्षिक बाब विद्यार्थ्यासमोर मांडली. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.व्ही.बी.पाटील यांनी केले. महाविद्यालयीन कार्यक्रमास सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते, तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वयंसेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.




