अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खु, पिंपळे बु व आटाळे गावातील शाळकरी मुले ही दररोज शाळेत येजा करत असताना या वेळी अमळनेर आगारातील बसेस विद्यार्थ्यांना घेऊन जात नाहीत, असा आरोप करीत सकाळी ८.५० वाजेच्या सुमारास या तिन्ही गावातील शाळकरी मुली मुलांनी रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी जवखेडा ते अमळनेर रस्त्यावर दोघी बाजूला मोठ्या प्रमाणावर बसेस व इतर वाहनांच्या मोठी गर्दी झाली होती. या मुलांच्या आंदोलनात त्याचे पालक देखील धावून आले होते. भर रस्त्यावर एक ते दीड तास हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात मुलांनी अमळनेर, कडे जाणाऱ्या तसेच जवखेडा कडे जाणाऱ्या सर्व बसेस अडवून ठेवल्या होत्या. लहान मुले बसेस अडवून आंदोलन करत असल्याने खर्दे येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी पूर्ण वेळ थांबून त्यांना शांततेचे आवाहन केले. सकाळी ९.३० च्या सुमारास हे शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी बस स्टॉपवर आटाळे येथून एक ते दोन किलोमीटर पायी ये जा करतात. थेट कंडक्टर व ड्रायव्हर यांनी वाहतूक नियंत्रक दीपक बोरसे यांच्याशी फोनवर संवाद साधला. सकाळी बंद करण्यात आलेली बस पूर्ववत चालू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवले. वाहतूक नियंत्रक दीपक बोरसे यांचे ग्रामस्थ व सामजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी आभार मानले.