
बन्सीलाल पॅलेस येथे साडेदहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन…
अमळनेर:- अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज २ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

शहरातील प्रताप मिल कंपाउंडमधील बन्सीलाल पॅलेस येथे सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील असतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉक्टर बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, स्मिताताई वाघ खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी वाङ्मय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




