पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला दिला सकारात्मक प्रतिसाद…
अमळनेर:- पंतप्रधान मोदींनी एक तास स्वच्छतेसाठी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून शहरातून सुमारे १८ टन कचरा साफ करण्यात आला. मंत्री अनिल पाटील देखील स्वच्छ अभियानात सहभागी होऊन बस स्थानक व धुळे रोड परिसरात स्वच्छता केली.
नगरपरिषदने गोळा केला १८ टन कचरा…
अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी प्रत्येक प्रभागात एक या प्रमाणे १७ ठिकाणी केंद्र नेमून घंटा गाड्या ठेवल्या होत्या. तसेच बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. माती,प्लस्टिक पिशव्या, रिकाम्या बाटल्या, खाली पाऊच व कचरा झाडून गोळा करण्यात आला. तसेच गवत व झुडुपे काढण्यात आले. धर्माधिकारी फाउंडेशन तर्फे देखील आरके नगर ते महाराणा प्रताप चौक अशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सहा ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र ठेवण्यात आले होते. सर्व मिळून सुमारे १८ टन कचरा गोळा झाला. हा कचरा गावाबाहेरील कचरा डेपोत जमा करण्यात येऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, बांधकाम अभियंता डिंगबर वाघ, अमोल भामरे, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, पाणी पुरवठा अभियंता प्रवीण बैसाणे, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, हैबत पाटील, वसुली विभागाचे सोमचंद संदानशीव, प्रसाद शर्मा, मुकादम आणि सफाई कर्मचारी हजर होते.
मारवड पोलिसांनीही राबविले स्वच्छता अभियान…
तालुक्यातील मारवड येथील पोलिस ठाण्यात सपोनि शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत पोलीस ठाण्याच्या आवारात साफसफाई मोहीम राबविली. या मोहिमेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ही सक्रिय सहभाग घेतला. यावेळी सपोनि शितलकुमार नाईक, पीएसआय विनोद पाटील, मपोकॉ स्मिता भालदे, हेकॉ सचिन निकम, पोना सुनील तेली, हेकॉ फिरोज बागवान, हेकॉ मुकेश साळुंखे, पोकॉ संजय पाटील, हेकॉ संजय मकडू पाटील, पोकॉ महेंद्र सोनवणे, सफाई कर्मचारी बशीर शेख यांनी मोहिमेत सहभाग घेतला. तसेच सपोनि नाईक यांचा चिरंजीव विवान शीतलकुमार नाईक यानेही आपल्या वडिलांसोबत साफसफाई केली.
मंगरूळ गावात राबविली स्वच्छता मोहीम…
तालुक्यातील मंगरूळ येथे देखील ग्रामपंचायत ,स्व अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालय, वस्ती शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाने, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, भटू पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, सीमा मोरे, खुशाल पाटील,प्रदीप पाटील, सुदर्शन पवार व विद्यार्थ्यांनी साफसफाई केली.