
मायबोली मराठी वाहिनीच्या नृत्य स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धकातून मिळवला प्रथम क्रमांक…
अमळनेर:- मायबोली मराठी वाहिनीवरील ट्रेंडिंग सुपरस्टार या नृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी असेलल्या निक्षीता पाटील (शिसोदे) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

बोरगाव येथील रहिवासी असलेले व सीआरपीएफ (श्रीनगर) मध्ये कार्यरत असलेले नितीन पाटील यांची कन्या नीक्षिता पाटील ही पुणे येथील रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता आठवीत शिकत असून ट्रेंडिंग सुपरस्टार या नृत्य कलेच्या स्पर्धेत तिची निवड झाली होती. तिने आपल्या मनमोहक नृत्यकलेचे प्रदर्शन करत सर्व स्पर्धकांना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला. तिला ट्रॉफी व ट्रेंडिंग सुपरस्टारची पदवी देवून विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तिला अंकित डान्स क्रिएशनचे अंकित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना बोलवून घेत निक्षीता पाटील हीचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच तिचा लहान भाऊ मोहित व डान्स टीचर अंकित पाटील यांचे ही कौतुक केले. तसेच मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके, नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, उपनगराध्यक्ष पूजा वाहिले यांनी ही निक्षीताचे कौतुक केले आहे.




