
जेष्ठ नागरिक व मतदार यांचा प्रांताधिकाऱ्यांनी केला सत्कार…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा अवर सचिव यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात १ ऑक्टोबर जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शताब्दी मतदार व जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरी पार केलेल्या आटाळे येथील लाडकाबाई रामचंद्र अहिरे, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील (वय ८३) , नथु नफरा पाटील (वय ९०), आटाळे येथील दुर्गाबाई हिराचंद पाटील (वय ८६), पंडित भावसिंग पाटील (वय ८५) ,पुष्पाबाई भिवसिंग पाटील (वय ८१) या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना शासनाचे आभार मानले व ‛जवानी तुमनी ढयी गयी, हुई ग्यात आते धल्ला , बिगर मांगाना दिवू नका हू आंडोरले सल्ला’ ही अहिराणी कविता सादर केली. याप्रसंगी नायब तहसीलदार राजेंद्र ढोले, नितीन ढोकणे, विजय धमके, संदीप पाटील, श्याम पाटील हजर होते.




