सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:– सोच फाउंडेशन अमळनेर व संगिनी रियुजेबल क्लॉथ प्रॉडक्ट्सच्या वतीने पातोंडा येथील वीटभट्टी कामगार महिलांना मासिक पाळीत येणाऱ्या विविध समस्या व स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच त्यांना रियुजेबल क्लॉथ सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले.
मासिक पाळीत येणाऱ्या समस्या व मासिक पाळीतील स्वच्छता या विषयावर सोच फाउंडेशन च्या अध्यक्षा नयना चौधरी यांनी मार्गदर्शन केले, तसेच संस्थेच्या सचिव व संगिनी रियुजेबल प्रॉडक्ट्सच्या भाविक पाठक यांनी रियुजेबल क्लॉथ सॅनिटरी पॅड बद्दल बोलताना प्लास्टिक व केमिकल युक्त पॅड शरीराला तसेच आपल्या पर्यावरणाला कसे घातक आहेत व यामुळे पर्यावरणाची कशा प्रकारे हानी होत असते या संदर्भात माहिती दिली. याऊलट रियुजेबल क्लॉथ सॅनिटरी पॅड हे अँटी बॅक्टरीअल बांबू व कॉटन कापडापासून तयार केले आहे. सदर पॅड हे लिकप्रूफ असल्याने डाग पडत नाहीत व याची शोषण क्षमता ही अत्याधिक असून हे पॅड स्वच्छ करून एक वर्षापर्यंत वापरता येते त्यामुळे प्रति महिना पॅड वर होणार खर्च सुद्धा कसा वाचवीता येतो याचे महत्व देखील कामगार महिलांना पटवून दिले. व सदर पॅड स्वच्छ करण्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास संस्थेचे सदस्य व पातोंडा येथील रहिवासी मुरलीधर बिरारी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास वीटभट्टी परिसरातील महिला तसेच संस्थेचे सदस्य महेश माकडे व विजय चौधरी हे उपस्थित होते.