
बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक…
अमळनेर:- तालुक्यात काल २२ कोरोना बाधीत आढळले असून यात सर्व रुग्ण शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.
वृंदावन नगर १, पटवारी कॉलनी १, देशमुख नगर १, मुंदडा नगर २, साने नगर १, ताडे पुरा १, मिल चाल १, केशव नगर २, ढेकू रोड १, पैलाड २, प्रसाद नगर १, आर के नगर ४, प्रताप मिल कपाऊंड १, बंगाली फाईल १, सिद्धी विनायक कॉलनी १, वसई देवी चौक १ असे रुग्ण असून ग्रामीण भागात काल एकही बाधित आढळून आला नाही. त्यामुळे एकंदरीतच शहरात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा परत विसर पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. बाजारपेठेत, दुकानात तसेच अनेक शासकीय व खाजगी कार्यालयात कार्यालयात विनामास्क येणाऱ्याची संख्या अजूनही लक्षणीय आहे.