५ मिनिटात १२५ गणितीय समीकरणे अचुक सोडवण्याचे पेलले आव्हान…
अमळनेर:- उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ विभागीय एसआयपी अबॅकस स्पर्धेत सहभागी झालेल्या अमळनेर केंद्राच्या ४१ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांनी विक्रमी यश मिळवून विविध ट्रॉफीज जिंकल्या. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विभागीय एसआयपी अबॅकस स्पर्धा पार पडली. यात नाशिकसह अकोला पर्यंतच्या ७ जिल्ह्यातील १४०० पेक्षा अधिक विध्यार्थ्यानी स्पर्धेस सहभाग नोंदवला. यात विविध १४ लेवलच्या जेतेपदासाठी अमळनेर केंद्राच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्कील व गतीक्षमतेची शर्थ केली. ५ मिनिटात १२५ गणितीय समीकरणे अचुक सोडवण्याचे आव्हान या स्पर्धेत होते. साई दिलीप पारीक, पार्थ मुकुंदा शिंदे या विद्यार्थ्यानी फर्स्ट रनरसह अन्य पुरस्कार व ट्रॉफी मिळवली. लव्य निलेश जैन, हितेश्री सचिन पाटील, आरोही योगेश शिरोडे, फाल्गुनी शामकांत वाणी, हरिष संदीप सोनवणे, पार्थ पियुष शहा, कार्तीक गुलाब वाघ हे विद्यार्थी स्पर्धेत सेंकड रनरअप ठरले. स्पर्धेसाठीचा अत्यंत कठीण बेंचमार्क कस्तुरी रोडगे, आरोही योगेश येवले, कुआ योगेश सिरोडे, गायश्री भाऊसाहेब वारुळे, कनिष्का अनिल महाजन, श्रेयस गणेश पारीक, तेजस पंकज पाचपुते, जतीन महेंद्र पाटील, जिवीका अविनाश चव्हाण, तेजस्वीनी भागवत महाजन कृष्णा दिनेश पाटील, विराज दिपक पाटील, स्वयंम जयकुमार पाटील, दक्ष कमलेश जैन, ज्ञानेश दीपक पाटील, हेतल कैलास बावीस्कर स्नेहल विकास महाजन, संपदा प्रशांत सोनार, दिशांत सुभाष जाधव, सागनीक संदीप सौदुखे, अर्जुन ज्ञानेश जोशी, समीक्षा हेमराज पाटील या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले. आर्या प्रशांत देसाई बेस्ट परफॉर्मरची ट्रॉफी जिंकली. बक्षीस वितरण एसआयपी अबॅकस भारतचे प्रमुख दिनेश व्हीक्टर, जयशंकर, राजेंद्र नन्नावरे, सागर धुळे, विवेक, आमदार रणवीर सावरकर आणि पीडीके विद्यापीठाचे रजीस्ट्रार डॉ. राठोड यांच्या हस्ते पार पडले. अमळनेरातील एसआयपी अबॅकसच्या संचालिका स्नेहा अजय रोडगे यांच्या नेतृत्वाखाली कविता शिंपी, शितल पाटील, धाराणी पाटील, भाग्यश्री पाटील, भाग्यश्री शेटे या शिक्षीकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत उत्कृष्ठता येण्यासाठी परिश्रम घेतले. अमळनेर मधील सर्व पालकांनी, प्रिसीपल, ग्लोबल स्कुल यांनी साने गुरुजी विद्यालय मुख्याधापक, सेंट मेरी स्कुल यांनी यशस्वी विद्यार्थी आणि अबॅकस शिक्षकांचे कौतुक केले.