
न्यायालयाने दोघा युवकांची केली पोलिस कोठडीत रवानगी…
अमळनेर:- महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल तालुक्यातील जानवे व रणाईचे येथील दोघांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंस्टाग्राम या सोशल मीडियावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून समाधान मैराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जानवे येथील कल्पेश पाटील व रणाईचे येथील हरीश बोरसे या दोघांविरुद्ध ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत. दोन्ही आरोपींना काल अमळनेर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची संध्याकाळी जळगाव सब जेल मध्ये रवानगी करण्यात आली आहे.




