प्रताप महाविद्यालय व महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन…
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालय व महिला मंच, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी घडताना बिघडताना हा कार्यक्रम प्रताप महाविद्यालयाच्या कै. काकासाहेब राणे सभागृहात पार पडला.
इ.११ वी व १२ वी च्या युवक-युवतींनी वाढत्या वयाबरोबर काय करावे? व काय करू नये ? याबाबत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांची संवाद साधत संजय गोविलकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी उस्फूर्त प्रतिसाद दिला व उपस्थिती राहून कार्यकमाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमाचे प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी. जैन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उल्हास जी. मोरे, पर्यवेक्षक प्रा. आर. एम. पारधी , प्रा. बी.आर. गुलाले, प्रा.बापू संदानशिव, प्रा.मंदाकिनी भामरे प्रा.शालिनी पवार, प्रा.कविता माळी, प्रा.मेघना पवार, प्रा.कीर्ती पाटील, प्रा.पुनम चोपडे, प्रा.श्वेता पाटील, प्रा. पूनम शिंदे यासह महिला मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.