
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त माहिती प्रकल्प व वक्तृत्व स्पर्धा संपन्न…
अमळनेर:- शहरातील नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त विवीध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्र संघटनेने वर्ष 2023 हे ‘तृणधान्य आंतरराष्ट्रीय वर्ष ‘ म्हणून घोषित केले आहे. तृणधान्ये यांची लागवड, पोषक तत्वे यांविषयी जागरूकता होणे हा यामागील उद्देश आहे. यानुसार शासनाने दिनांक 1 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर हा पंधरवडा साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार अमळनेर येथील नवीन मराठी शाळेत तृणधान्य वर्षानिमित्त सामूहिक चर्चा, तृणधान्य माहिती प्रकल्प, शाळा व्यवस्थापन समिती बैठक व वक्तृत्व स्पर्धा इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धा व विद्यार्थी निर्मित प्रकल्पाचे प्रदर्शन दि 10 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक जे डी निकुंभ हे उपस्थित होते. तर शाळेचे मुख्याध्यापक मच्छिन्द्र मोरे हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी तृणधान्याचे आहारातील फायदे व आवश्यकता यांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तृणधान्याचे माहिती देणारे प्रकल्पाचे प्रदर्शनाचे आयोजन करून जनजागृती केली. उत्तम भाषण देणाऱ्या व तृणधान्यवर आधारित दर्जेदार प्रकल्प तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले व पारितोषिक दिले. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.




