अमळनेर:- येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बी.एस्सी तसेच एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांसाठी जैवविज्ञानावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
७२ विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन ३६ रांगोळ्या रेखाटल्या. अतिशय कलात्मकरित्या रांगोळी काढलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. ए. बी.जैन व सह चिटणीस डॉ. धीरज वैष्णव यांनी कौतुक केले. रांगोळी प्रदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. अनेकांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेटी दिल्या. स्पर्धेचे परीक्षक म्हणून विघ्नहर्ता पॅथॉलॉजी लॅबच्या संचालिका सौ. प्रतिभा मराठे व बी. व्होक. विभागाच्या प्रा. सुचित्रा रत्नपारखी यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख प्रा. एस. ए. जोशी तसेच विभागातील प्रा. वैशाली महाजन, प्रा. हेमलता सूर्यवंशी भोसले, प्रा. स्नेहल सूर्यवंशी, प्रा. नुतन बडगुजर, प्रा. चैताली सोनार, प्रा. नेहा पवार, प्रा. प्रीती देशमुख, प्रा. आदित्य संकलेचा, प्रा. मंजुषा मराठे, प्रा. प्राजक्ता चौधरी, प्रा. नेहा महाजन यांनी संयोजन केले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी विलास पाटील, किशोर सोनार यांचे सहकार्य लाभले.