
तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील यांची निवड
अमळनेर:- जळगाव जिल्हा भाजपाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून त्यात अमळनेर तालुक्यातून भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी भिकेश पावबा पाटील, उपाध्यक्षपदी बाळासाहेब जीवन पाटील तर चिटणीस पदी मीनाताई रमेश पाटील यांची निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल ना गिरीश महाजन, माजी आमदार स्मिताताई वाघ ,भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तसेच अमळनेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी भाजप कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवरांनी भिकेश पाटील, बाळासाहेब पाटील, मीनाताई पाटील यांचे अभिनंदन केले.




