अमळनेर बसस्थानकावरील प्रकार, पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- बस मधून प्रवाश्यांचे पैसे लांबवणाऱ्या चाळीसगाव येथील महिलेला पोलिसांनी अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
भीमराव सोनू बिऱ्हाडे (रा प्रियदर्शनी नगर नगाव बारी धुळे) हे ११ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अमळनेरहून दोधवद (हिंगोणे) येथे जाण्यासाठी बस मध्ये चढत असताना एका महिलेने त्यांच्या खिश्यात हात घालून सहाशे रुपये काढत असताना बिऱ्हाडे यांनी हात पकडला. मात्र महिलेने हात झटकून पळ काढला. त्यावेळी बसस्थानकावरील लोकांनी तिला पकडले. पोलीस चौकीतील महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे, अशोक कुमावत,निलेश मोरे यांनी तिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने तिचे नाव संगीताबाई विष्णू लोंढे, वय ४५ रा इंदिरानगर चाळीसगाव असे सांगितले. बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून संगीताबाई सह अज्ञात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.