
अमळनेर:- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच प्रा डॉ रवींद्र शोभणे, मराठी वाङमय मंडळ व कै आप्पासाहेब र का केले सार्वजनिक ग्रंथालय आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी अमळनेरात येत आहेत.

मसाप पुणेचे कार्यवाह डॉ. वि. दा. पिंगळे हे दिनांक १५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात त्यांची मुलाखत घेणार आहेत. व्याख्यानमालेचे उदघाटन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अशोक जैन, प्राचार्य तानसेन जगताप, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, डॉ अनिल शिंदे, राजेश पांडे, डॉ नरेंद्र पाठक, राजेंद्र भामरे, भरत अमळकर, जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, सदाशिव बोरसे हजर राहणार आहेत.




