
यंदा बाजारात निरुत्साह, शुभमुहूर्तावर वस्तू घेण्यासाठी गर्दी नाही…
अमळनेर:- तालुक्यात यंदा एकूण ८३ नवरात्र मंडळे असून मोठ्या मुर्त्यांना मागणी नसून लहान मुर्त्यांना जास्त मागणी असल्याचे दिसून आले आहे. तसेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बाजारात उत्साहात कमी दिसून आला.

घरोघरी घटस्थापनेसाठी महिलांची लगबग सुरू होती. बाजारात घटसाठी मातीची घागर, बांबू टोपली, उददाणी, दिवा, पणती, देवी मूर्ती, हिरवा चुडा, विड्याची पाने, खारीक खोबरे, सुपारी, बदाम, ओटी, खण, नारळ, कापूर, अगरबत्ती, उद, चुनरी, गरबासाठी टिपऱ्या, रांगोळी, रंग, फुलहार यांची दुकाने सजली होती.
नवरात्रच्या शुभमुहूर्तावर वाहन, इलेकट्रॉनिक्स वस्तू घेण्यासाठी यावर्षी गर्दी नाही. बाजारात मंदी दिसून आली. शहरात ६१ मंडळे तर ग्रामीण भागात २२ मंडळे आहेत. त्यात खाजगी १२ मंडळे आहेत. विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक एसआरपी, दोन आरसीपी प्लाटून, ५० होमगार्ड तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.




