
२५ ऑक्टोबरपर्यंत माघारीची मुदत, ५ नोव्हेंबर रोजी मतदान…
अमळनेर:- ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम अंतर्गय तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्यांसाठी आज दि १६ पासून अर्जस्वीकृती करण्यात येणार आहे. तर या पंचायतीसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे ९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या पोटनिवडणुका देखील घेण्यात येणार आहेत.

अमळनेर तालुक्यातील रढावन, मुडी प्र. डां., ढेकू सिम, लोंढवे, पिंपळे खु., अमळगाव, गोवर्धन, नंदगाव, भरवस, दोधवद, मंगरूळ, सडावण बुद्रुक, शिरसाळे बुद्रुक, मठगव्हाण या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तर मुंगसे, पिंगळवाडे, बाम्हणे, बोदर्डे, लोणसीम, लोण चारम, लोण खुर्द, नगाव खुर्द, कुऱ्हे खुर्द आदी ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी पोट निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तहसीलदार यांनी ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान ११ ते ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर २३ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी तर २५ ऑक्टोबर पर्यंत ३ वाजता माघारीची अंतिम मुदत आहे. २५ रोजीच दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान होईल आणि ६ रोजी मतमोजणी होईल.




