
अमळनेर:- शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील मयूर संजय साळी (वय २६) याने राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

गल्लीत देवीचे आगमन होत असताना मयूर आपल्या मित्रांबरोबर नाचला आणि इकडे देवीची आरती सुरू असताना त्याने घरात जाऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले असून अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. जयेश साळी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेकॉ संतोष पवार करीत आहेत.

