
अमळनेर:- शहरातील साने गुरुजी कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने तृणधान्य उत्सव साजरा करण्यात आला.

दिनांक १३ रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे तृणधान्य उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे या होत्या. शिक्षिका मोनाली वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थिनींनी तृणधान्यावर आधारित डबे आणले होते. या तृणधान्यावर आधारित डब्यांचे निरीक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका बोरसे, शिक्षिका मनीषा वैद्य, शिक्षिका धनश्री वानखेडे यांनी केले. दैनंदिन जीवनात तृणधान्याचे महत्व मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे यांनी विद्यार्थिनींना सांगितले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद हजर होते.




