अमळनेर:- अर्ज दाखल करण्यासाठी वेळेची मुदतवाढ दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० अर्ज सरपंच पदासाठी तर २६ अर्ज सदस्यांसाठी दाखल झाले आहेत. सर्व्हर सुरू झाल्याने बुधवारी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी वेळ मिळाला. वेळ वाढल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्जस्वीकृती सुरू होती.
तालुक्यात १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक सुरू झाली आहे. तर नऊ गावांची पोटनिवडणूक सुरू आहे. आज पुन्हा अर्जांची वाढ होण्याची शक्यता असून काही गावातुन एकही अर्ज दाखल झालेला नाही. आज अर्ज मोठ्या प्रमाणावर दाखल होतील अशी अपेक्षा आहे.