
अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी २६ तर सदस्यांसाठी १८२ अर्ज दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी एकूण ६३ तर ग्रामपंचायत सदस्याच्या १२६ जागांसाठी एकूण ३२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी २६ तर सदस्यांसाठी १८२ अर्ज दाखल झाले आहेत.

तालुक्यातील दहीवद येथे सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने तेथे सरपंचपद हे बिनविरोध निश्चित झाले आहे. तीन गावांच्या पोटनिवडणुकीत अनुसूचित उमेदवार न मिळाल्याने त्या जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत. नऊ गावांच्या पोटनिवडणुकीत सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर मंगरूळ येथे तालुक्यातून सर्वाधिक ५४ अर्ज आले आहेत. तर मुंगसे पोटनिवडणुकीत येथे सर्वसाधारण स्त्री सर्वागासाठी एकमेव अर्ज आल्याने ती जागा ही बिनविरोध झाली आहे. कुर्हे खु. अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी एकमेव अर्ज आल्याने ती जागा ही बिनविरोध झाली आहे. तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये नामाप्र स्त्री संवर्गासाठी दोन अर्ज प्राप्त झाले आहेत. नगाव खु. अनुसूचित जमाती स्त्री, लोण खु. सर्वसाधारण, पिंगळवाडे अनुसूचित जमाती स्त्री, बोदर्डे सर्वसाधारण स्त्री, बाम्हणे नामाप्र या जागांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने त्याही बिनविरोध झाल्या आहेत. तर मुंगसे अनुसूचित जमाती स्त्री, लोणचारम अनुसूचित जमाती, लोण सिम अनुसूचित जमाती, या तीन गावांना अनुसूचित जमातीच्या एकही उमेदवाराचा अर्ज न आल्याने त्या जागा रिक्त राहणार आहेत.




