
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथील ज्येष्ठ प्राध्यापक विश्वनाथ देविदास पाटील (भूगोल विभाग प्रमुख) यांची उपप्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली.

महाविद्यालय विकास समितीच्या सभेमध्ये तीन वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली. जयवंतराव पाटील, देविदास शामराव पाटील, देविदास बारकू पाटील, युवराज काशिनाथ साळुंखे, दिनेश वासुदेव साळुंखे, साहेबराव राजाराम चव्हाण, नरेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. वसंत देसले, समितीतील सर्व संचालक यांनी निवड करून अभिनंदन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.




