
मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिनिधींकडे सोपवला अमृत कलश…
अमळनेर:- देशाच्या स्वातंत्र्यात अमळनेर तालुक्याच्या मातीचे योगदान होते. या मातीच्या कणाकणात जनतेच्या भावना गुंतल्या आहेत. ही माती संस्कारांनी भरली आहे. त्यामुळे अमळनेरचा कलश प्रेरणा देणारे आहे. आज ही माती ‛अमृत’ कलशातून मुंबईहून दिल्लीला जात आहे ही तालुक्याच्या दृष्टीने स्वाभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तालुक्याचा अमृत कलश नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधींकडे सोपवताना केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोप करण्यात येत असून तालुक्यातील प्रत्येक गावातून मूठभर माती कलशातून संकलित करून ती एकत्रित रित्या तालुक्याच्या अमृत कलशातून दिल्ली येथे पाठ ण्यात येत आहे. पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते भारत मातेचे पूजनाने झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, बाजार समिती संचालक नितीन पाटील, प्रा सुरेश पाटील हजर होते. सुरुवातीला प्रातिनिधिक स्वरूपात वावडे, आटाळे, गडखांब, खेडीखुर्द,बोहरा, सुंदरपट्टी, एकरुखी , निंभोरा , धानोरा , महिला ग्रामसेवक व महिला मंडळ यांचे कलश मंत्री अनिल पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. त्यांनतर मंत्री पाटील यांनी तालुक्याचा अमृत कलश नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सागर कोळी, वैशाली शिंदे यांच्याकडे सोपवला. सुरुवातीला ग्रामसेवक संघटना, महिला मंडळ, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागातर्फे मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी, सूत्रसंचालन संजय पाटील तर आभार ग्रामविस्तार अधिकारी एस एस कठळे यांनी मानले. सानेगुरुजी कन्याशाळेच्या विद्यर्थिनींनी इशस्तवन स्वागतगीत म्हटले. कार्यक्रमास विस्तार अधिकारी एल डी चिंचोरे, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे, नितीन पाटील, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, कैलास पाटील, अंगणवाडी सेविका हजर होते.




