अमळनेर:- तालुक्यातील जानवे येथील ३५ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना दिनांक २१ रोजी घडली आहे.
रवींद्र मल्हारी पाटील (वय ३५) याने २१ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरात लाकडी सऱ्याला सुती रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेचे वृत्त कळताच गावातील भुपेंद्र पाटील, ईश्वर पाटील, कैलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन रवींद्र याला खाली उतरवले आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शरद साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.