अमळनेर:- शहरातील शिरूड नाका परिसरातील ५८ वर्षीय इसमाने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली आहे.
प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) याने २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुभाष चौकात गादीच्या बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरुषोत्तम चौधरी यांच्या खबरीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल घनश्याम पवार करीत आहेत.