
ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याचे लोकनियुक्त सरपंचांनी केले प्रतिपादन…
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे खु येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी सर्वांच्या एकमताने लोकनियुक्त सरपंच पदासह पाच ग्रामपंचायत सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात यश आले आहे.

सरपंच पदासाठी वर्षा युवराज पाटील ह्या बिनविरोध लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आल्या आहेत. तसेच तिन्ही वार्डातील पाच उमेदवार बिनविरोध करण्यात यश आले आहे. त्यात वॉर्ड क्रमांक १ मधून लोटन भिल बिनविरोध निवडून आले आहेत. तर वॉर्ड क्रमांक २ मधून शोभाबाई गोकुळ पाटील, संतोष बापू चौधरी हे निवडून आले आहेत. वॉर्ड क्रमांक ३ मधून कल्पना साहेबराव पाटील, अरुण संभाजी पाटील हे निवडून आले आहेत. वॉर्ड क्रमांक १ मध्ये दोन जागेंसाठी निवडणूक लागली आहे. गावाचा विकास व्हावा या हेतूने ही निवडणुक बिनविरोध केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक ३ मधील उमेदवार माजी शेतकी संघ प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील यांच्या पत्नीची उमेदवारी मागे घेण्यात आली. याप्रसंगी निबा दला चौधरी, पुरुषोत्तम लोटन चौधरी, भाऊसाहेब आप्पा पाटील, जयवंतराव दगा पाटील, भीमराव नारायण पाटील, निंबा दयाराम चौधरी, नारायण दामू पाटील, न्हानभाऊ हिलाल पाटील, विनोद नाना पाटील, सुदाम बळीराम पाटील, गणेश मोतीराम पाटील, प्रकाश दिगंबर पाटील, छोटु पाटील, अरुणाबाई दगा पाटील, सुरेखा जयवंत पाटील,कविता संभाजी पाटील,वैशाली विनोद पाटील, वैशाली रवींद्र पाटील, विजय शशिकांत पवार व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.




