अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील सरपंचपदी पुन्हा कुसुमबाई भास्कर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून काल ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
आधी झालेली सरपंच निवड प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा आयुक्तांनी दिल्यानंतर पुन्हा प्रक्रिया राबविण्यात आली. सरपंच पदी पुन्हा कुसुमबाई भास्कर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच हंसराज मोरे, ग्रामपंचायत सदस्य विजय कोळी, मीनल कोळी, कविता नंदवे, विद्याबाई पाटील, सुनंदा पारधी, ग्रामसेवक प्रांजल वाघ आदी यावेळी हजर होते. सदर निवडी प्रसंगी किरण जैन, कृउबा संचालक डॉ अशोक पाटील, विजय पाटील, नत्थु पाटील, भास्कर चैत्राम पाटील, राजेंद्र धनगर, दीपक बडगुजर, विनायक पाटील, सुरेश पाटील, काशिनाथ बडगुजर, रावसाहेब कोळी, सुरेश कोळी आदींनी हजेरी लावत सरपंच कुसूमबाई पाटील यांचे अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी पी एस पाटील यांनी काम पाहिले.