अमळनेर:- मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी अमळनेर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवारी बंद पुकारला असून येथील तहसील कार्यालयासमोर कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
१०० व ५०० रुपयांचे मुद्रांक विक्री बंद करू नये, कमिशन ३ टक्केवरून १० टक्के करण्यात यावे, मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने मिळावेत, मुद्रांक विक्री मर्यादा १० हजारावरून एक लाख करण्यात यावी, फ्रांकिंग देखील मुद्रांक विक्रेऱ्यांकडून करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी बंद पुकारला होता. यावेळी मुद्रांक संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्ता संदानशीव, उपाध्यक्ष शामकांत शिंदे, गणेश येवले, सेक्रेटरी संजय साळुंखे, खजिनदार सतीश वाणी, सह खजिनदार धनंजय बडगुजर, प्रमोद वाणी, महेंद्र भावसार, देवीदास पाटील, मधुकर नारळे, सुनील पाटील, गुणवंत राव पाटील, विरेंद्रराव देशमुख, बापू पाटील, दिनेश पानकर, प्रशांत पवार आदी यावेळी उपोषणाला बसले होते.