
अमळनेर:- दि २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी केंद्र बंद राहणार असल्याने अमळनेर तालुका फर्टिलाझजर असोसिएशनने देखील यादरम्यान आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयक क्रमांक 40, 41, 42, 43 व 44 मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यासाठी निषेध म्हणून सदर बंदचा निर्णय घेतला असून तरी शेतकरी बांधवानी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अमळनेर तालुका फर्टिलायझर असोसिएशनने केले आहे.




