
श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न…
अमळनेर:- आम्ही विकास कामे करताना राजकारण करीत नाही, सर्वसामान्य माणसाचे कामे करण्याला प्राधान्य देतो. मात्र निधी हा एकच टप्प्यात मिळत नाही. तो टप्प्याटप्प्याने मिळवावा लागतो, असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी कपिलेश्वर येथे केले.

तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे पार पडलेल्या विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तापी पांझरा संगमावरील पुरातन कालीन श्रीक्षेत्र कपिलेश्वर तीर्थक्षेत्रावर विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या विविध विकास कामांमध्ये पांझरा नदीवरील पादचारी पूल, कपिलेश्वर मंदिरासमोरील हंसानंद घाट तसेच कपिला गोशाळा या वास्तूंचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, कृषीभूषण साहबेराव पाटील, स्मिता वाघ, रामकृष्ण पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील, मंदिराचे मठाधीपती तथा अध्यक्ष हंसानंदजी महाराज बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती भिकेश पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ. अनिल शिंदे, सुभाष पाटील, सचिन पाटील, ॲड. ललिता पाटील, डॉ. अविनाश जोशी, प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, खा. शि. मंडळाचे संचालक हरी वाणी, प्रा. अशोक पवार, पिंटू राजपूत, जळगाव तसेच धुळे जिल्ह्यातील व पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली.
भिकनराव पाटील यांनी केला मंत्र्यांचा सत्कार…

पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा कै.भालेराव रामभाऊ पाटील सायन्स कॉलेज यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. कपिलेश्वर मंदिर भक्तनिवास लोकार्पण कार्यक्रमासाठी जात असताना मारवड कै.बी. आर पाटील सायन्स ज्युनियर कॉलेज मारवड येथे मंत्र्यांनी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी शाळेचे चेअरमन व उपसरपंच भिकनराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच आशा सुभाष भिल, संस्थेचे सचिव हेमकांत पाटील, तसेच हर्षल भिकनराव पाटील, स्वीय सहाय्यक नवलराजे, गजानन चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.




