
नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वादविवाद स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक…
अमळनेर:- नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याने हवालदार डॉ.शरद पाटील यांचा पो.नि. विजय शिंदे यांनी सत्कार करत कौतुक केले.
मानव अधिकार जनजागृती प्रित्यर्थ नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वाद विवाद स्पर्धा विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होती. त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोह. डॉ.शरद पाटील यांनी प्रतिनिधित्व केले व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. त्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकिकात भर पडली आहे. पोह. डॉ.शरद पाटील केलेल्या कामगिरीचा सन्मान म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत पोह. डॉ.शरद पाटील यांचा सत्कार केला व केलेल्या कामगिरीचा येथोचीत सन्मान केला. यावेळी विजय शिंदे यांनी सांगितले की, पोलीस खात्यात काम करतांना स्वतःला अद्ययावत ठेवणे अत्यंत मुश्किल गोष्ट असून अशाही परिस्थितीत डाॅ.शरद पाटील सारखे हिरे स्वयंप्रकाशाने चमकतात ही केवळ आपल्यासाठी नाही तर पोलीस खात्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्हास याचा सार्थ अभिमान आहे, अशा शब्दात नावलौकिक करून सोबतच्या अंमलदारांना देखील प्रेरणा दिली आहे. डॉ. शरद यांचे सहकारी पोलिस व सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.




