अमळनेर:- जळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने चाळीसगाव येथे झालेल्या रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये अमळनेरातील खेळाडुंनी उत्तम यश संपादन केले.
चाळीसगाव येथे नुकतीच ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती,यात अमळनेर येथील स्केटिंग कोच श्याम शिंगाने व मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू सहभागी झाले होते यात कपीश भूपेंद्र जैन, तन्मय वैद्य, दत्तात्रेय नितिन शिंगाने, जिग्नेश श्रीराम पाटील, कविश महेन्द्र पाटील, आराध्य विश्वजीत कुलकर्णी, ध्रुव सदानंद गोसावी, साई सुनील पाटील, प्रसाद दिवाकर पवार, मिलिंद अनिल पाटील आदींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उत्तम यश संपादन केल्याने त्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या संकल्पनेतून श्री शिवाजी महाराज उद्यानाच्या बाजूला भव्य स्केटिंग ट्रॅक साकारला असल्याने या ट्रॅकमुळे अमळनेर येथील स्केटिंग आवड असलेल्या बालकांना स्केटिंग शिकण्याची संधी मिळून अनेक खेळाडू तयार होत आहे. दररोज सायंकाळी सदर स्केटिंग ट्रॅक मुलांच्या सरावाने बहरलेला असतो,मुलांचे कौशल्य पाहण्यासाठी मोठी गर्दी येथे होत असते.याठिकाणी कोच श्याम शिंगाने आणि मिलिंद पाटील हे प्रचंड मेहनत घेऊन प्रशिक्षण देत असतात. चाळीसगावच्या चॅम्पियनशिप मध्ये येथील मुलांनी विशेष प्राविण्य मिळविल्याने सदर गुणवंत खेळाडूंचा न्यू प्लॉट परिसर विकास मंचतर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी मंचचे मार्गदर्शक दिलीप ललवाणी, देवांग शाह तसेच अध्यक्ष चेतन राजपूत, अरुण पाटील,स्कुल बोर्डचे अधीक्षक सुनील साहेबराव पाटील, कोच श्याम शिंगाने, मिलिंद पाटील यासह पालक वृंद उपस्थित होते.