अमळनेर:- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील १४ वर्ष १ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी दिनांक १३ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरातून काही न सांगता निघून गेली. तिचा शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाली. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.