अमळनेर:- तमाशा पाहायला गेलेल्या एकाची मोटारसायकल चोरट्याने लांबविल्याची घटना मुडी प्र. डांगरी येथे घडली असून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भरवस येथील प्रशांत पाटील यांचा मुलगा दिनांक ९ रोजी रात्री लोकनाट्य तमाशा पाहण्यासाठी मुडी प्रं. डांगरी येथे गेला होता. त्याने आपली होंडा कंपनीची सीबी शाईन दुचाकी क्रमांक एमएच १९ बीवाय ३६९० ही मुडी येथे गायत्री माता मंदिराजवळ लावली होती. तो तमाश्याहून परत आला असता दुचाकी लावलेल्या जागी दिसून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र दुचाकी मिळून न आल्याने मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवली असून पुढील तपास हेकॉ भरत इशि करीत आहेत.