
अमळनेर:- बैलांनी पाणी पिण्यासाठी धाव घेतल्याने वालखेडा कोल्हापूर बंधाऱ्याच्या खड्यात बैलगाडी कोसळून बैलासह बुडाल्याची घटना १७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. त्यात सुदैवाने वृद्ध शेतकरी बचावला आहे

मुडी प्र. डांगरी येथील पांझरा नदीकाठावर कोल्हापूर बंधाऱ्याच्या जवळ शेती असलेल्या भावाच्या शेतात सर्जेराव तुकाराम शिंदे (वय ७५) हे बैलगाडी घेऊन शेतात काम करण्यासाठी गेले. काम झाल्यानंतर सायंकाळी घरी परतत असतांना पाणी पाजण्यासाठी बैलगाडी जुंपली असता बैलांनी थेट पाणी पिण्यासाठी धाव घेतली. वयोमानानुसार शेतकरी पळू शकला नाही मात्र बैलगाडी थेट बंधाऱ्याकडे निघाली त्याठिकाणी काठावर खड्डा असून ती थेट खड्ड्यात कोसळली. गाडी लोखंडी असल्याने थेट बैलासह गाडी बुडाली. ही बातमी मासे पकडण्याऱ्या व्यक्तींनी ही बाब गावात कळवली. माहिती मिळताच त्यांचा मुलगा आशिष याने शेतात धाव घेतली. व वडिलांना घेऊन घरी आला.
त्यामुळे डोळ्यासमोर बैल बुडतांना दिसलेले शिंदे बेशुद्ध झाले. त्यांची एक लाखाची नवी बैलजोडी होती. आणि पूर्ण गाडी लोखंडी ५० हजाराची असे दीड लाखांचे नुकसान झाले. रात्र झाल्याने बैलांचा आणि गाडीचा शोध घेता आला नाही. दरम्यान या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी मारवड पोलिसांना ही बाब कळविली असून सकाळी बैलगाडी काढण्यासाठी बाभळे येथून मोठी क्रेन मागविली आहे. व सकाळी पंचनामा होणार आहे.

