
आयएमए, ग्रीन अमळनेर ग्रुप आणि शहर व तालुका पत्रकार संघातर्फे मोफत आयोजन…
अमळनेर:- भारतात सुरू असलेलेल्या वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम सामना रविवार दिनांक 19 रोजी होणार असल्याने सदर अंतिम सामन्याचे भव्य डिजिटल स्क्रीनवर थेट प्रक्षेपण जि. प. विश्राम गृह,अमळनेर येथे मोफत दाखविण्यात येणार आहे.
अमळनेर येथील डॉक्टरांचे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए,अमळनेर), क्रिकेट शौकिनांचा ग्रीन अमळनेर ग्रुप आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने सदर आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये अतिशय फार्मात असलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचल्याने संपूर्ण भारतात अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.सदर सामना अमळनेरकराना सामूहिकरित्या पाहण्याचा आनंद देण्यासाठी सदरचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 19 रोजी दुपारी 2 वाजेपासून प्रक्षेपणास सुरूवात होणार आहे.तरी क्रिकेट शौकिनांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए,शाखा अमळनेर), ग्रीन अमळनेर ग्रुप व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.




